.

.

श्री शनि परिचय आणि श्री शनि पीडा शांतीचे उपाय

१) नावे शनैश्वर, सौरि, शनि, मंद, कौणस्थ, पिंगलो, बभ्रु, कृष्णो, रौद्र, यम
२) जन्म क्षेत्र सौराष्ट्र (गुजरात)
३) वडिलांचे नाव सुर्यदेवता
४) आईचे नाव छाया
५) भावांची संख्या ६ ( मुख्य भाऊ यमराज )
६) बहिणींची संख्या ३ ( मुख्य बहिण यमुना )
७) पत्नीचे नाव ध्वजिनी, धामिनी, चैव, कंकाली, कलहप्रिया, कंटकी, कलही, तुरंगी, महिषी
८) आकारमान सौरमंडळात दोन नंबरचा मोठा ग्रह
९) गुरुदेव / देवता शिवजी,ब्रम्हाजी,यम
१० अधिमित्र भैरवजी,बालाजी,हनुमानजी
११ चाल एका महिन्यात १ अंश चाल
१२ एका राशीत चाल एका राशीत अडीच वर्षात ३० अंश
१३ स्वंय राशी मकर राशी आणि कुंभ राशी
१४ मित्र राशी वृषभ, वृषभ, मिथुन, तुळ, कन्या, धनु, मीन
१५ शत्रु राशी मेष, वृश्चिक, कर्क, सिंह
१६ आवडते रंग काळा निळा
१७ स्वभाव क्रोधी, अनुशासनप्रिय, धार्मिक, दयाळु, तीक्ष्ण, दारूण
१८ दिशा पश्चिम
१९ ज्योतिषीय दृष्टी ३, ७, १० व्या घरावर
२० वय वृध्द
२१ धातु लोखंड
२२ कार्यक्षेत्र व्यापार, न्यायपालिका, धर्म, राजनीती, चिकित्सा, विज्ञान क्षेत्र
२३ शुभ दृष्टी ने भिकारीला सुध्दा राजा बनवेल.
२४ कुदृष्टी ने राजाला सुध्दा भिकारी बनवेल.
२५ गुण तामसिक
२६ सण अमावस्या, गुढी पाडवा, मकर संक्रांति, शनैश्चर अमावस्या, शनि जयंती
२७ वार शनिवार
२८ प्रकृती वात
२९ गोत्र कश्यप
३० वनस्पती शमी
३१ शरीरावर परिणाम कमरेपासुन खाली
३२ अंग पुर्ण उजवे अंग
३३ रत्न नीलम, काळा हकीक
३४ बली(अधिकार)वेळ रात्रीवर/अंधारावर अधिकार
३५ भाग्योदय वर्ष ३६वा, ४२वा, ४८वा, ६०वा
३६ युवावस्था ३०वर्षानंतर
३७ दृष्टी वाकडी/ तिरपी
३८ उच्च राशी तुळ
३९ नीच राशी मेष
४० अस्त राशी कर्क, सिंह
४१ दानाची वेळ सुर्योदयापुर्वी, सुर्यास्तानंतर, आणि राहु काळात
४२ दान पदार्थ लोखंड,कोळसा,तेल,चामडे,मीठ,गुळ,काळेतीळ,कांबळ,उडीद,काळेवस्त्र,काळीगाय
४३ नक्षत्र पुष्य, अनुराधा, उत्तरा भाद्रपदा
४४ शनि महादशा १९ वर्षे
४५ ढैय्या/अडीचकी अडीच वर्षे
४६ शिक्षण वैद्यकीय, कायदा, दर्शन, तंत्र मंत्र, ज्योतिष, कर्मकांड, वाणिज्य
४७ मालक पक्षी जाती, क्षुद्र जाती
४८ शरीरातील स्वरूप स्नायुमंडळ, शरीरातील लोह, खुप आळसी, किंवा कर्मठ
४९ व्यापार लोखंडाचा,कोळश्याचा,तेलाचा,मशिनरीचा,वाहन,फँक्टरी,रसायन,हार्डवेअर,चमडा
५० अनुकुलता उपाय जप, अभिषेक, पौराणिक शांती उपाय, वैदिक शांती अनुष्ठान, शनि शांती महायज्ञ, दान

     
                श्री शनिचे अनेक मंत्र 
                 श्री शनि पौराणिक मंत्र
   ।। ॐ नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम छायामार्तंड संभुतं तं नमामि शनैश्चरम ।।                                                           श्री शनि तांत्रोक्त मंत्र
                               ।। ॐ प्रां प्रीं प्रौं सं शनैश्चराय नमः ।।  
                                           श्री शनि एकाक्षरी मंत्र                                                                            ।।ॐ शं शनैश्चराय नमः।।
                                           श्री शनिदेव वैदिक मंत्र
             ।।ॐ शन्नो देवीर भिष्टये आपो भवन्तु पीतये शन्यो रभिस्त्रवन्तु नमः।।                                                                     श्री शनि पीडाहर मंत्र
      ।। सुर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्ष: शिवप्रिय: मंदचारा: प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनि: ।।
                                    श्री शनि गायत्री मंत्र
         ।। ॐ शनैश्चराय विदमहे छायापुत्राय धीमही तन्नो मंद: प्रचोदयात ।।
        ।। भगभवाय विदमहे मृत्युरुपाय धीमही तन्नो शनिः प्रचोदयात ।।
                                  श्री शनिदेवाचे गुरु श्री महादेवाचा मंत्र  
    ।। ॐ त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम । उर्वारुक मिव बन्धनान मृत्योर्मुक्षीयमामृतात ।।
                                      श्री शनिदेवाची १० नावे 
  “ कोणस्थ, पिंगलो, बभ्रु, कृष्णौ, रौद्रान्तक, यमः, सौरी, शनैश्चराय, मंदः, पिप्पलादेन संस्तुत:(११वेळा),
 एतानि दशनामानि प्रातःरुत्थाय य पठेत, शनैश्चरकृत पीडा न कदाचित भविष्यती, ॐ शं शनैश्चराय नमः” (१ वेळा)       


                                         श्री शनि पत्नीची नावे  
ध्वजनी धामिनी चैव कंकाली कलह प्रिया
कलही कंटकी चैव तुरंगी महिषी अजा
शनेर्नामानी पत्नी नामेतानी सन्नुपण पुमानी
दु:खानी नाश्येतिनित्यं सौभाग्यमेधते सुखम
      पिप्पलाद उवाच
नमस्ते कोणसंस्थाय पिंगलाय नमोस्तुते
नमस्ते बभ्रुरूपाय कृष्णाय च नमोस्तुते
नमस्ते रौद्रदेहाय नमस्ते चांतकाय च
नमस्ते यम संज्ञाय नमस्ते सौरये विभो
नमस्ते मंद संज्ञाय शनैश्चर नमोस्तुते
प्रसाद कुरु देवेश दिनस्य प्रणतस्य च
कोणस्थ पिंगलो बभ्रु कृष्णौ रौद्रौन्तको यमः
सौरी शनैश्चराय मंदः पिपलादेन संस्तुत:
एतानि दशनामानि प्रातरुत्थाय य पठेत
शनैश्चरकृत पीडा न कदाचित भविष्यती
 ॐ शं शनैश्चराय नमः

           १) श्रीशनि स्तोत्र (साडेसातीमध्ये दररोज सकाळ संध्याकाळी)
नमस्ते कोण संस्थाय पिंगलाय च नमोस्तुते । नमस्ते बभ्रुरूपाय कृष्णाय च नमोस्तुते ।।१।।
नमस्ते रौद्र देहाय नमस्ते चांतकायच । नमस्ते यमसंज्ञाय नमस्ते सौरये विभो ।।।।
नमस्ते मंदसंज्ञाय शनैश्चराय नमस्ते । प्रसादं कुरु देवेश दिनस्य प्रणतस्यच ।।।।
कोणस्थ पिंगलो बभ्रू कृष्णौ रौद्रत्मको यम: । सौरी शनैश्चरो मंद पिप्पलादेन संस्तुत
एतानि दशनामानि प्रातरुत्थाय य पठेत शनैश्चर कृपा पीडान कदाचित भविष्यती
                      २) सिद्ध श्रीशनि यंत्र पुजन विधान
ज्यांना श्रीशनिदेवांची पीडा असेल किंवा नसलेल्या त्या सर्वांनी श्रीशनि यंत्र पुजन अभिषेक करायला पाहिजे.प्राणप्रतिष्ठीत श्रीशनि तांब्याचे यंत्र एका भांड्यात घ्यावे व त्यावर २१ वेळा मोहरीच्या(सरसोच्या) तेलाचा अभिषेक करावा.व प्रत्येकवेळी २१ वेळा श्रीशनिचा पौराणिक मंत्र म्हणावा.
पौराणिक मंत्र -    निलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम
                        छाया मार्तंड संभुतं तं नमामि शनैश्चरम
ते साठवलेले सर्व तेल दुसऱ्या भांड्यात घ्या व त्यामध्ये आपला चेहरा बघा व श्रीशानिंना आपले कष्ट,बाधा,परेशानी सांगा व क्षमा  प्रार्थना करा व आपली पीडा,त्रास कमी व्हावी म्हणून विनंती करावी.त्या तेलामध्ये लोखंडी खिळा टाकावा.ते तेल खिळयासकट  पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे.(तेलाभिषेक सुरु केल्यापासून पिंपळावार तेल वाहावे पर्यंत आवर्जुन मौन पाळावे)व तेल अर्पण केल्यावर सरळ घरी यावे.(खिळा दान स्वरूप आहे). हे सलग ९ शनिवार करावे.
९व्या शनिवारी ज्या भांड्यात चेहरा पाहिलेला आहे ते भांडेही पिंपळाला अर्पण करावे.
प्रत्येक शनिवारी तिळगुळाच्या लाडवांचा प्रसादसुद्धा पिंपळाला अर्पण करावेत.
ह्या प्रयोगाने श्रीशानिदेव कठिणात कठीण परिस्थितीत मार्ग प्रदान करतात.
                  ३) शनिवारच्या उपवासाचे नियम 
१) शनिवारच्या उपवासाच्या दिवशी संकल्प करून ७,,१६ किंवा ३३ शनिवार होईपर्यंत आपल्या अत्यंत आवडता खाण्याच्या पदार्थाचा त्याग करावा.उपवास पुर्ण होईपर्यंत तो पदार्थ खाणार नाही असा संकल्प करावा.
२) शनिवारी सुर्योदयापुर्वी उठुन पौराणिक मंत्राच्या ३ माळा कराव्यात.श्रीशनि यंत्रासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा,तिळगुळाच्या लाडवांचा नैवेद्य ठेवा.शानिचालीसाचा पाठ करावा,कर्पूरआरती करावी.हे सर्व
    झाल्यानतर प्रसाद पिंपळाच्या झाडाखाली ठेवावा.
३) शनिवारी सुर्योदयापुर्वी गुळ,तीळ,उडीद मिश्रित पाणी शनिदेवांची १० नावे घेत पिंपळाला घालावे.
४) शनिवारी १ वेळचे जेवण आळणी कांदा,लसून शिवाय करावे व १ वेळचे आपले जेवण एखाद्या गरीबाला दान करावे.
५) शनिवारी ब्रह्मचर्य पाळावे.
६) शनिवारी व्रत/उपवासाचा अधिक फायदा मिळण्यासाठी त्या दिवशी अजिबात क्रोध करू नये.
७) शनिवारी श्रीशनि मंदिर किंवा श्रीहनुमान मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे.श्रीहनुमान चालीसा आणि श्रीशनि चालीसाचा पाठ करावा.
                    ४) श्रीशनि उपासकांसाठी आवश्यक नियम
१) सुर्योदयापुर्वी श्रीशनिदेवांच्या बेलामध्ये उठावे.
२) सकाळी उठल्यावर अंथरुणातच श्रीशनिदेवांच्या १० नावांचे ११ वेळा स्मरण करावे.`दिवसभर आपली कृपा राहावी व आपला क्रोध शांत व्हावा यासाठी मी आपले स्मरण केलेले आहे असे म्हणावे.
३) शनिवारी सकाळी प्रातःस्नान  होईपर्यंत मौन व्रतधारण करावे.
४) अमली पदार्थ,द्रव्याचे सेवन बंद करावे लागेल.
५) शनिवारी श्रीशनि कृपा प्राप्तीसाठी इदं न मम चा भाव नेहमी हृदयात करावा की आपल्या कणा कणात ईश्वराचा आभास करून आम्ही सर्वासमोर  
    झुकतो आहे,थोडक्यात मनामध्ये जरासुद्धा अहंकार धरू नये.
६) सुर्योदयापुर्वी अंघोळीनंतर श्रीशनि यंत्राजवळ तेलाचा दिवा लाऊन श्रीशनि स्मरण करून श्रीशनि चाळीसाचा पाठ करावा.
७) बीजमंत्र-ॐ शं शनैश्चराय नमः चा ११ माळा जप करा किंवा यथाशक्ती जप करावा.
८) शनिवारी सुर्योदयापुर्वी पाण्यात गुळ घालुन गोड करावे व त्यात १ चमचा काळे उडिद,काळे तीळ घालुन श्रीशनिदेवांचे १० नावांचे उच्चारण करत प्रदक्षिणा घालत पिंपळाला अर्पण करावे.
९) दर शनिवारी सुर्योस्तानंतर तीळगुळाच्या लाडवांचा प्रसाद दाखवावा व मोहरीच्या तेलाचा मातीचा दिवा लावावा.
१०) शनिवारी आपला क्रोध अधिकाधिक शांत ठेवा.                                                                                   ५) श्रीशनि कृपा प्राप्तीसाठी
१) सुर्योदय किंवा सुर्योस्तानंतर गुळ,तीळ,काळे उडीद यांचे पाणी अर्पण करावे व मोहरीच्या तेलाचा दिवा पिपळांखाली लावावा.
२) सुर्योदय किंवा सुर्योस्तानंतर श्रीशनि मंत्र,स्तोत्र व चाळीसाचे पठण करावे.
३) शनिवारी तळलेली गोड पुरी काळ्या कुत्र्याला व कावळ्याला खाऊ घालावी.
५) भिकारी,अपंग,कोडी,अंध यांना काळे वस्त्र व लोखंडाच्या दैनदिन जीवनात लागणाऱ्या वास्तू दान कराव्यात.
६) आपला कर्मचारी,नोकर,सेवकाबरोबर योग्य व्यवहार करावा.
७) प्रसिद्ध श्रीशनि स्थळी जाऊन अभिषेक करावा.
                       ६) श्रीशनिदेवाच्या प्रसन्नतेची ओळख  
जन्मतःच श्रीशनि २,५,९ व्या स्थानात(चंद्रापासुन)किंवा चंद्रापासुन ३,७,१० स्थानात श्रीशनिदेव असतील तर ते प्रसन्नतेचे सुचक आहे.पण तेच श्रीशनिदेव शत्रु राशीत, निचेचा किंवा चंद्रमा, सुर्य व राहुच्या बरोबर असेल तर त्यांच्या शुभफलात न्युनता आणते. श्रीशनिची अर्धीच कृपा राहील.किंवा चंद्रापासुन श्रीशनि २,५,९ च्या राशीत किंवा ३,७,१०व्याराशीत अनुक्रमे वृषभ,सिंह,धनु  किंवा मिथुन,तुळ,मकर राशीत असतील तर श्रीशनिची खुप प्रसन्नता मिळते व ते खुप चांगले मानले जाते.हि सर्व पुर्व जन्माची चांगली फळे मिळतात. ह्याच्या उलट जर श्रीशनिदेव चंद्रापासुन १,६,११ वा ४,८,१२ तर याला श्रीशनिची पीडा किवा प्रकोप मानला जातो.
जर १,६,११,४,८,१२ व्या स्थानात श्रीशनिदेव शत्रुराशीत निचीचा होऊन अस्त होऊन चंद्र, सुर्य, राहु, केतुच्या बरोबर असतील तर त्याची तीव्र वाईट फळे मिळतील. श्रीशनि प्रसन होत नाहीत.
लोखंडाचा व्यापार,कोळशाचा व्यापार, पेट्रोल, डिझेल, तेलाचा व्यापार, मेडीकल, मशिनरी, फॅक्टरी, वाहन, टान्सपोर्ट, गॅरेज, मेकॅनिक, ऑटोपार्टस, काळ्या वस्तुंचा वापर, चिकीत्सा क्षेत्र, कोर्ट कचेरी संबंधित वकील, न्यायाधीश,अध्यात्म संबंधित कोणतेही मिशन चालवण्याच्या संबंधित, हार्डवेअरचा व्यापार हे सर्व व्यापार श्रीशनिच्या अधिपत्याखाली येतात.जर हे सर्व व्यवसाय व्यवस्थित चालत असतील तर श्रीशनिदेवांची कृपा आहे हे समजावे अन्यथा नाही.जर वरील व्यवसाय बंद करण्याची वेळ येत असेल तर श्रीशनिदेवांचा प्रकोप आहे असे समजावे.
शुगर, लकवा, उजव्या अंगाची पीडा, वात, संधिवात, गँस्ट्रीक अॅटॅक, किडनी रोग, पायांचे वारंवार फाटणे, उडीद डाळ, तळलेले पदार्थ न पचणे, काळा रंग वापरल्यास वारंवार त्रास होणे, लोखंडापासुन वारंवार इजा होत असेल तर श्रीशनिदेवांचा प्रकोप समजावा.
                                 ७) श्रीशनि देवतांचे संबंधित देवतागण
१) पिंपळाच्या झाडाखालील शिवलिंग               २) श्री हनुमानजी                                     ३) श्री तिरुपती बालाजी                                    ४) श्री भैरवनाथ
                              ८) अनिष्ट श्रीशनिच्या शांतीसाठी उपाय
१) प्रत्येक शनिवारी सुर्योदयापुर्वी उठुन श्रीशानिंची आराधना करावी.
२) ज्या शनिवारी श्रीशानिंचे उत्तरा भाद्रपद नक्षत्र असेल त्यावेळी शमी वनस्पतीची मुळी घरी घेऊन यावी व ती गंगाजलाने धुऊन काळ्या कपडयातबांधुन उजव्या हाताच्या मनगटाला बांधावी.हि श्रीशनिपीडा निवारणाचा चांगला उपाय आहे.
३) ज्यावेळी श्रीशनिचें तीन नक्षत्रांपैकी(अनुराधा,पुष्य,उत्तर भाद्रपदा) कोणतेही नक्षत्र असेल त्यावेळी भोजपत्र घेऊन ते स्वच्छ करा व त्यावर(चौकोनी तुकडयावर) श्रीशनि यंत्र काढावे.त्याला विधिवत अक्षता, पुष्प, कुंकू,नैव्यद्य,धुप,दीप दाखवुन त्याचे पुजन करा.नंतर त्याची घडी घालुन काळ्या कपडयात गुंडाळून काळ्या धाग्याने ते उजव्या हाताच्या दंडाला बांधावे.व त्याआधी श्रीशनि मंत्राचा १०८ वेळा मंत्र जप करावा.श्रीशनि रोग निवारणार्थ हा चांगला उपाय आहे.
४) ह्या यंत्राला प्रत्येक शनिवारी बनवुन त्याची पूजा करून आपली समस्या,कष्ट बोलुन वाहत्या पाण्यात सोडावे.त्याने सुद्धा लाभ होतो.
५) दररोज सकाळी उठल्यावर दक्षिण दिशेला नमस्कार करून श्रीशनिदेवांच्या १० नावांचा ११ वेळा उच्चार करूनच अंथरून सोडावे.
७) दररोज रात्री झोपण्यापूर्वी श्रीशनि चालीसा किंवा श्रीशनि मंत्राचा पाठ करावा
                               ९) श्रीशनि पीडा निवारण मंत्र, तंत्र, व उपाय
१) तांत्रोक्त मंत्र २) पौराणिक मंत्र ३) वैदिक मंत्र ४) श्रीशनि गायत्री मंत्र ५) श्रीशनिदेव लघु मंत्र 
   अ) श्रीशनिदेव लघु मंत्र - श्रीशनिदेव लघु मंत्राचा चालता फिरता किंवा कोणतेही कार्य करताना म्हणला पाहिजे. ज्यावेळी मनावर किवा शरीरावर    
      श्रीशनि पीडा असेल,शारीरिक कष्ट असेल त्याच्या मुक्तीसाठी मंत्र पठाण करत राहिले पाहिजे.
   ब) तांत्रोक्त मंत्र-ज्यावेळी श्रीशनि साडेसाती किंवा श्रीशनि ढय्या चालु असेल त्यावेळी दररोज १ माळ करावी.
  क) पौराणिक मंत्र- ज्यावेळी श्रीशनि महादशा किंवा अंतर्दशा चालु असेल किंवा कोणतेही काम रखडलेले असेल तर ह्या मंत्राचा जप करावा. आती    
     भारी संकट असेल तर ह्या मंत्राचा २३००० जप २३ दिवसात करावा
  ड) वैदिक मंत्र- ह्याने श्रीशनि शांती यज्ञ करावा.
  इ) श्री गायत्री मंत्र- संपुर्ण परिवाराच्या सुख शांतीसाठी ह्या मंत्राचा पाठ करावा.ज्या शनिवारी श्रीशनिचे नक्षत्र असेल त्यावेळी श्रीशनि यंत्र घरी  आणावे.प्रत्येक शनिवारी लोखंडाच्या पत्र्यावर स्थापन असलेल्या यंत्रावर मंत्र म्हणत मोहरीच्या तेलाचा १०८ वेळा अभिषेक करावा.नंतर ते तेल दुसऱ्या भांड्यात घ्यावे.ते यंत्र स्वच्छपुसुन त्याची अक्षता,धुप,दीप,कुंकू विधिवत पूजा करावी.ते यंत्र ठेवून द्यावे आणि हे तेल लोखंडाच्या दिव्यात जाळावे.हा उपाय साडेसाती, पानौतीसाठी खुप उपयुक्त आहे.जर हाच विधी अमावस्येला केल्यास रखडलेली कामे मार्गी लागतील.अभिषेक केलेले तेल आपल्या बाधा निवारणार्थ,श्रीशनि कृपाप्राप्तीसाठी प्रार्थना करून घरीच लोखंडाच्या दिव्यात जाळावे.
                         १०) श्रीशनि अनिष्टापासुन वाचण्याचे उपाय
१) श्रीशनिचा संबंध लोखंडाशी आहे.त्यामुळे घर किंवा व्यवसाय येथे लोखंडाच्या फर्निचरचा उपयोग करावा,जर श्रीशनि पत्रिकेत निचीचा असेल तर  
    लोखंडी फर्निचरचा वापर कधीही करू नये.
२) शनिवारी ज्यावेळी पुष्य, अनुराधा, उत्तरा भाद्रपद नक्षत्र असेल त्या दिवशी शमी किंवा वाच्छोल वनस्पतीची मुळी घरी घेवुन या, त्याला गंगाजलाने साफ करा, काळ्या कपडयात काळ्या धाग्याने तावीज सारखे बांधा व ते उजव्या हाताच्या दंडावर बांधा. 
      ११) मेष राशीचा निचीचा,वृश्चिक राशीचा त्रासदायक,कर्क व सिंह राशीवर अस्त असलेल्या श्रीशनि पीडेसाठी उपाय
    प्रतिदिन सुर्योदयापुर्वी उठुन दक्षिण दिशेला नमस्कार करून पश्चिम दिशेला तोंड करून श्रीशनि देवाचे स्मरण करा.
२) ज्या शनिवारी श्रीशनींचे ३ पैकी कोणतेही नक्षत्र असेल त्यादिवशी काळ्या वस्तूंचे दान करावे.                           
३) प्रत्येक शनिवारी श्रीशनि मंदिरात जा व पिंपळाला पाणी घालुन गोडे पाणी,काळे तीळ,उडीद सहित अर्पण करावे.
४) काळी गाय पाळा व प्रत्येक दिवशी व विशेष करून शनिवारी भरपूर चारा किंवा जेवण भरवा.
५) श्रीशनिचे नक्षत्र ज्यावेळी शनिवारी असेलत्यावेळी काळ्या म्हैशीला काळे चणे शिजवून त्यात मीठ घालुन पोटभर खायला द्यावे.
                                         १२) श्रीशनि साडेसाती उपाय
१) श्रीशनि साडेसाती पौराणिक मंत्राचा २३००० जप साडेसात वर्षाच्या आत करणे बंधनकारक आहे.२३,००० जप २३ दिवसात संपायला पाहिजे.जर जातक १५ वर्षाच्या आतील आहे तर त्यासाठी त्याच्या आई वडिलांनी किंवा पुरोहिताने मंत्र जप केला तर चालतो.ह्या काळात सात्विक जेवण घ्यावे,जमिनीवर चटईवर झोपावे, ब्रह्मचर्यपाळावे. एकाच बैठकीत जप पुर्ण करावा.(मंत्र-निलांजन समाभासं...)
२) साडेसातीच्या काळात जेवढे पण श्रीशनि अमावस्या येईल त्यावेळी अर्धा मीटर काळे कापड घ्यावे त्यावर श्रीहनुमानाचे शेंदुरमध्ये मोहरीचे तेल घेऊन त्या काळ्या कपडयावर श्रीशनिचे १५चे यंत्र काढावे व त्यावर बिना पाण्याचा नारळ घेउन्तो आपल्या शरीरावरून ७ वेळा उतरून श्रीशनिदेवांना स्मरून व आपली पीडा सांगून ,ती निवारणार्थ प्रार्थना कराविव तो नारळ काळ्या कापडयासहित वाहत्या पाण्यात सोडवा.
 ३) प्रतिदिन सुर्योदयापुर्वी उठावे आणि श्रीशनिदेवाना अशी विनंती/प्रार्थना करा कि साढे सातीत होणाऱ्या कष्टांपासुन मुक्ती मिळण्यासाठी श्रीशनिच्या बेले मध्ये (सुर्योदयेपुर्वी) माझे जागरण स्वीकार करा.
४) सकाळी उठल्यापासुन आंघोळ होऊन नित्य कर्म होईपर्यंत जन्म दोष शांतीसाठी मौन पाळा.(कमीत कमी२तास) व श्रीशनिदेवांना अशी विनंती करा कि माझी जी साढे साती सुरु आहे त्याची शुभफल प्राप्त होण्यासाठी माझे मौनव्रत स्वीकार करा.
४) प्रत्येक शनिवारी श्रीशनि यंत्रासमोर सरसोच्या तेलाचा दिवा २४ तास तेवत ठेवावा.
५) प्रत्येक शनिवारी सरसोचे तेल रात्री डोक्याला लावुनच झोपावे.                                                                         १३) श्री शनि पनौती किंवा ढैय्याचे उपाय 
१) एक काळा कपडा घ्यावा त्यावर शेंदुरात तेल घालुन त्या कपडयावर श्रीशनि ३३ चे यंत्र काढावे व त्या कपडयात बिना पाण्याचा नारळ घेवुन ज्या रुग्णाला औषध काम करत नसतील, जी व्यक्ती शारीरिक त्रासाने त्रस्त असेल त्या व्यक्तीच्या डोक्यापासुन पायापर्यंत ७ वेळा श्रीशनि देवांचे स्मरण करत/मंत्र म्हणत त्या व्यक्तीला आराम पडावा अशी प्रार्थना करत उतारा करावा व ते लगेच वाहत्या पाण्यात श्रीशनि कृपा प्राप्तीसाठी प्रार्थना करून सोडुन द्यावा व पनौतीच्या काळात ज्या ज्या वेळी श्रीशनैश्चर अमावस्या येईल त्यावेळी हा उपाय सलग ३ श्रीशनैश्चर अमावस्येला  करावा.
२) श्रीशनि साडेसाती पौराणिक मंत्राचा २३००० जप साडेसात वर्षाच्या आत करणे बंधनकारक आहे.२३,००० जप २३ दिवसात संपायला पाहिजे.जर जातक १५ वर्षाच्या आतील आहे तर त्यासाठी त्याच्या आई वडिलांनी किंवा पुरोहिताने मंत्र जप केला तर चालतो. ह्या काळात सात्विक जेवण घ्यावे, जमिनीवर चटईवर झोपावे,ब्रह्मचर्यपाळावे. एकाच बैठकीत जप पुर्ण करावा. (मंत्र- ॐ प्रां प्रीं पौं )
३) शनिवारी सुर्योदयापुर्वी पाण्यात गुळ घालुन गोड करावे व त्यात १ चमचा काळे उडिद,काळे तीळ घालुन श्रीशानिदेवांचे १० नावांचे उच्चारण करत प्रदक्षिणा घालत पिंपळाला अर्पण करावे.
४) प्रत्येक शनिवारी कच्च्या धाग्याने पिंपळाला एक वेढा आपल्या श्रीशनि पनौतीच्या काळात शांती मिळावी ह्यासाठी प्रार्थना करून त्याला बांधावा व सरसोच्या तेलाचा दिवा पण लावावा.
५) श्रीशनैश्चर अमावस्येला अडीच किलो काळे उडीदाचा सकाळी ९ ते १० च्या दरम्यान आपल्या अंगावरुन ७ वेळा उतारा करून पाण्यात विसर्जन करावे.
६) श्रीशनैश्चर ३३ चे यंत्र शनिवारी श्रीशनि मुर्तीला स्पर्श करून गळ्यात धारण करावे.
              १४) कोणत्या दोषांच्या शांतीसाठी श्रीशनि शांती अनुष्ठान आवश्यक आहे. 
  १) ज्यांचा जन्म श्रीशनिंच्या पुष्य, अनुराधा, उत्तरा भाद्रपदा ह्यापैकी एका नक्षत्रात झाला असेल त्यावेळी त्याची श्रीशनिची महादशा सुरु असेल अशावेळी ती महादशा संपण्याच्या अगोदर ज्यादिवशी ह्या तीनपैकी एक जन्मनक्षत्र शनिवारी असेल त्या दिवशी श्रीशनि शांती अनुष्ठान करावे.
२) ज्यांचा जन्म साढेसाती मध्ये झाला आहे त्यांना श्रीशनि शांती अनुष्ठान अनिवार्य आहे.
३) जर जन्मताच श्रीशनि आणि चंद्रमा एकत्र असतील तर ते साढे सातीतील मधले पर्व सुरु असुन विषयोग बनलेला आहे व ह्या विषयोगासाठी श्रीशनि शांती अनुष्ठान करावे.
४) जन्मताच श्रीशनि व मंगळ युती असेल तर तो एक युतीदोष आहे तर ह्या युतीदोष शांतीसाठी श्रीशनि शांती अनुष्ठान करावे.
५) जर जन्मताच श्रीशनि आणि रवि एकत्र असतील तर तो विष्टीयोग योग बनलेला आहे व ह्या विष्टीयोगासाठी श्रीशनि शांती अनुष्ठान करावे.
६) जन्मताच श्रीशनिच्या युतीत राहु किंवा केतु असेल तर त्याला प्रवज्या दोष म्हणतात व तो ज्या स्थानात असेल त्या त्या स्थानाच्या नात्याचे आणि त्या स्थानाचे सुख कमी देतो म्हणुन ह्या प्रवज्या दोषासाठी श्रीशनि शांती अनुष्ठान करावे.
७) जर जन्मताच श्रीशनि मेष राशीत असेल तर तो नीचेचा होतो तर त्या दोषासाठी श्रीशनि शांती अनुष्ठान करावे.  
८) जन्मताच श्रीशनि सप्तम स्थानात स्वराशीत असेल किंवा पंचमेश,सप्तमेश श्रीशनि पंचम किंवा सप्तम स्थानाकडे बघत असेल विवाह बाधा निवारण साठी श्रीशनि शांती अनुष्ठान करावे.
९) जर एखादा असा रोग बरेच दिवस बारा होत नसेल किंवा डॉक्टरी इलाज सुध्दा काम करत नसेल त्यासाठी श्रीशनि शांती अनुष्ठान करावे. 
१०) व्यापारात अचानक घाटा, आर्थिक स्थिती वर खाली होत असेल, स्थैर्य येत नसेल तर व्यापार आणि आर्थिक स्थायित्वसाठी श्रीशनि शांती अनुष्ठान करावे.   
११) कुणाचे मानसिक संतुलन बिघडलेले असेल, वेडेपणा किंवा मंदबुद्धीपर्यंत गोष्टी गेल्या असतील तर श्रीशनि शांती अनुष्ठान करावे. 
१२) पारिवारिक कलह पासुन मुक्ती, सांपतिक वाटणीत न्याय, कोर्ट कचेरीत न्याय, कोणतेही असंभव काम संभव होण्यासाठी, राजकारणात यश मिळण्यासाठी श्रीशनि शांती अनुष्ठान करावे. 
१३) शिक्षणात बाधा, नोकरीत बाधा, प्रतियोगिता परीक्षेत बाधा येत असेल तर श्रीशनि शांती अनुष्ठान करावे. 
१४) श्रीशनि साढे साती, पनौती, महादशा, अंतर्दशा सुरु असेल तर श्री शनिना प्रसन्न करून तो कालावधी सुखकर होण्यासाठी तसेच लहान लहान अनेक छोटे उपाय करण्यापेक्षा एक वेळ पुर्ण श्रीशनि शांती अनुष्ठान करावे.                                              
                          १५) श्रीशनि महादशा शांती उपाय
१) दररोज सुर्योदयापुर्वी उठावे व अंथरुणातच श्रीशनिच्या १० नावाचा ११ वेळा उच्चार करावा. त्यापूर्वी दक्षिण दिशेला नमस्कार करावा.
२) १९ वर्षाच्या श्रीशनि महादाशेमध्ये श्रीशनि वैदिक मंत्राचा संकल्प घेऊन सव्वा लाख जप करणे जातकाला अनिवार्य आहे.कमीत कमी नित्य १ माळ
    जप झालाच पाहिजे.
     वैदिक मंत्र - ॐ शन्नो देवीर भीष्टय आपो भवंतु पीतये शन्नो रभि स्त्रवंतु नमः
३) शनि महादशेमध्ये प्रत्येक अमावस्येला घरची वा व्यावसायिक ठिकाणची चांगली स्वच्छता करावी व अमावस्या सुरु झाल्यापासून संपेपर्यंत दिव्यामध्ये मोहरीचे तेल घेऊन त्या मौली धागा(पंचरंगी)धाग्याची वात घालून दिवा तेवत ठेवावा.
४) प्रत्येक अमावस्येला बाधा निवारणासाठी पिपंळावर नारळ वाढवावा.
                             १६) निचेचा श्रीशनि उपाय 
१) शनिवारी कोणतेही शुभ कार्य करू नका.
२) पश्चिम दरवाजा असलेल्या घरात राहु नका किंवा त्याला आपले नाव देऊ नका किंवा पश्चिमद्वारवाल्या ठिकाणी व्यवसाय करू नका.
३) प्रत्येक शनिवारी एका तांब्यात पाव लिटर दुध घालुन कोणत्याही विहिरीत श्रीशनि मंत्र म्हणत अर्पण करावे.
४) दररोज श्रीशनिचा पौराणिक मंत्राचा १ माळ जप करावा व श्रीशनिदेवांना त्यांचा क्रोध शांत करण्यासाठी प्रार्थना करावी.
५) प्रत्येक शनिवारी सुर्योदयापुर्वी गुळ,काळे तील,उडीद यांचे पाणी पिपंळाला ७ प्रदक्षिणा करत अर्पण करावे व मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
६) घरात काळ्या टाईल्स, मार्बल,काळा रंग  किंवा काळ्या रंगाचे कपडे वापरू नयेत.
७) कधीही फँक्टरी,मशिनरी,लोखंड,कोळसा,तेल,पेट्रोल,धातू,गँरेज,ऑटो पार्टस,ट्रान्सपोर्टची कामे/व्यवसाय आपल्या नावाने किंवा एकटे करू नये.
८) भाऊ, वडील सोडुन इतर कोणाबरोबर पार्टनरशिप करू नका.
९) आपल्या नावाने मालमत्ता किंवा गाडी घेऊ नका नाहीतर विकण्याची वेळ येईल,नुकसान सोसावे लागेल.
१०) दोन्ही वेळचे जेवण करताना पहिली चपाती बाजुला काढुन ठेवावी व ती कुत्र्याला खाऊ घालावी.
११) श्रीशनैश्चर अमावस्येला आपले कोणतेही वापरलेले वस्त्र गरिबाला दान करावे व प्रार्थना करावी की जोपर्यंत हे वस्त्र ती व्यक्ती वापरेल तोपर्यंत  त्याचा
      आशिर्वाद मला लाभू दे.
१२) स्वतःच्या वाहनाने प्रवास करताना श्रीशनि मंत्र किंवा श्री हनुमानचालिसा पाठ जरूर ऐकावा.
१३) शनिवारी श्रीशनि पीडा शांतीसाठी अजिबात क्रोध करू नये.
१४) कोणत्याही अमावास्येला श्रीशनि भोग बनवा एक किलो पांढरे उडीद डाळेचे पीठ, दोन किलो गुळ, अर्धा किलो काळे तीळ, १०० ग्रॅम सरसोचे तेल.
      उडदाच्या डाळेच्या पिठात सरसोचे पीठ घालुन त्याचे कणीक बनवावे व त्यात बारीक करून गुळ आणि काळे तीळ घालुन ते एकजीव करावे व
      त्याच दिवशी ते संपुर्ण श्रीशनि देवांना नैवेद्य दाखवुन ते घरी घेवुन यावे, व त्यानंतर रोज सकाळी त्यातील १०० ग्रॅम प्रसाद काढुन एखाद्या मोठया
     झाडाच्या बुंध्याला मुंग्यांना किंवा किडे जीव जंतु असतील त्यांना श्रीशनि मंत्र म्हणत व निचेच्या शनिचा आपल्याला काही त्रास होऊ नये अशी
     प्रार्थना करत ते टाकावे.       
                   १७) श्रीशनिदोष शांती हेतु आवश्यक निर्देश 
१) संकल्प करा की साडेसातीची पीडा कमी होण्यासाठी दररोज सुर्योदयापुर्वी उठेन.
२) सकाळी उठल्यावर अंथरुणातच श्रीशनिदेवांच्या १० नावांचे ११ वेळा जप करावा.
३) शनिवारी लोखंड, कोळसा, तेल व्यवसायाची सामग्री, चमडयाच्या वस्तु, मशिनरी कधीही खरेदी करू नये.
                  १८) जन्मापासुन श्रीशनि लागले असतील तर..  
ज्यांचा जन्म श्रीशनिंच्या नक्षत्रात झाला आहे,ज्यांचा जन्म चढत्या,मध्यस्त,उतरत्या साडेसातीत झाला आहे, ज्यांचा जन्म श्रीशनैश्चर अमावस्येला झाला आहे त्यांना जन्मस्त श्रीशनि लागतो.श्रीशानीच्या संदर्भात जन्म घेणाऱ्या सगळ्याचे आयुष्य हे श्रीशनिने प्रभावित असते.त्यामुळे श्रीशनि  त्यांचा भाग्योदय असतो.खालील नियम आयुष्यभर पाळावे लागतील .
१) सकाळी उठल्यावर अंथरुणातच श्रीशनिदेवांच्या १० नावांचे ११ वेळा जप करावा.
२) सकाळी उठल्यापासुन आंघोळ होऊन नित्य कर्म होईपर्यंत जन्म दोष शांतीसाठी मौन पाळा.(कमीत कमी २तास)
३) जेवणात मीठ कमी असल्यास वरुन काळेच मीठ वापरावे.
४) जेवणानंतर लवंग खावी.
५) दुपारी व रात्री जेवताना मौन पाळावे.
६) शनिवारी कुणावरही रागाऊ नका, क्रोध करू नका.
७) प्रतिदिन श्रीशनिंचा पौराणिक मंत्राचा १ माळ जप करावा.
८) घरातील वडीलधारी लोकाचा मानसन्मान ठेवा,त्यांची सेवा करा.
९) आपल्या घरातील महिलांशी आदराने, सहानभुतीने, स्नेहाने वागा. श्रीशनि प्रधान लोकांचा स्त्रीच्या माध्यमातुनच भाग्योदय होतो.   
१०) मांसाहार व दारू यांचे सेवन करू नये.जे लोक श्रीशनि प्रधान आहेत, ज्यांच्या सप्तमात श्रीशनि आहेत, ज्यांना संतान नाही त्यांनी मांसाहार आणि मद्यप्राशन केल्यास त्यांना भारी दोष लागतो, त्यांना सुखी होण्याचे मार्ग मिळत नाहीत.  
११) काळा किंवा भगवा(केसरी) ह्यांचा तुम्ही जास्तीत जास्त वापर करायला हवा. शनिवारी हा रंग जरूर वापरा.
१२) शनिवारी श्रीशनि संबंधित लोखंड, काळा कोळसा, तेल, पेट्रोल, काळ्या वस्तु, वाहन खरेदी करू नका.
१३) शनिवारी काळ्या वस्तु, लोखंड, कोळसा, तेल, चमडयाच्या वस्तु, काळा कपडा, उडीद,काळे तीळ ह्याचे श्रीशनि मंदिरात जरूर दान करावे.
१४) प्रत्येक श्रीशनैश्चर अमावस्येला गरिबांसाठी  अन्नदान करावे.
१५) प्रत्येक शुभ कामे शनिवारीच करावीत.
१६) शमी झाडांची मुळी काढुन काळ्या कपडयात लिपटुन ,उजव्या हातात बांधावी. वरील नियमांचे जेवढे शक्य होईल तेवढे पालन करावे. 
                                 १९) जन्मताच श्रीशनि पाया
मूळ कुंडलीत श्री शनिची चंद्रापासून असणाऱ्या स्थितीवर श्रीशनि पाया ठरतो.
  भाव        पाया       परिणाम
१,६,११,     सोने        साधारण-परिवारासाठी चांगले बालपण चांगले, किशोर व युवा अवस्था सोन्यासारखे तापावे लागते.
२,५,९        चांदी       चांगला-सुखप्राप्ती होते. समाधानकारक जीवन, संपत्ती, सुख
३,७,१०      तांबे        मध्यम-आनंद व प्रगतीकारक, ना अधिक कष्ट ना अधिक संपन्नता
४,८,१२      लोखंड    अति कष्ट-अत्याधिक कष्ट 
                                २०) श्रीशनि पीडा शांती उपाय     
खालील उपाय वारंवार करावेत, श्रीशनिदेव  प्रसन्न होतात.
१) गुळापासून बनवलेले पदार्थ प्रत्येक अमावस्येला श्रीशनिदेवाला नैवेद्य दाखवुन अधिकाधिक लोकांना प्रसाद वाटावा.गुळ घालुन गोड पुरी मोहरीच्या तेलात तळली तर अधिकच उत्तम.
२) तिळगुळाचे लाडू व रेवडी श्रीशनिदेवांना प्रत्येक शनिवारी अर्पण करून लोकांमध्ये वाटावी.
३) उडीदाच्या डाळीचे वडे मोहरीच्या तेलात तळुन शनिवारी श्रीशनिदेवांना दाखवुन सर्वाना वाटावे व कावळ्यांना सुद्धा खायला द्यावेत.
४) प्रत्येक शनिवारी एका वाटीत तेल घेवुन त्यात आपला चेहरा बघून ते तेल श्री शनि मंदिरातील दिव्यासाठी दान द्यावे. 
५) कोणत्याही श्रीशनैश्चर अमावस्येला १ लिटर मोहरीचे तेल शत्रुपासुन मुक्ती  मिळण्यासाठी व विजयी होण्याची प्रार्थना करून वाहत्या पाण्यात सोडावे.
६) गुळ, काळा कपडा,काळे उडीद,काळे तीळ,मोहरीचे तेल,लोखंडाचे कोणतेही भांडे कोणत्याही श्रीशनैश्चर अमावस्येला श्रीशनि मंदिरात जरूर दान करावे किंवा एखाद्या गरीब,वृद्ध व्यक्तीस श्रद्धापुर्वक नमस्कार करून ह्या वस्तु दान कराव्यात.सर्व वस्तूंची मात्रा कमीतकमी पाव-पाव किलो असावी.दान करताना सतत श्रीशनि मंत्राचा जप करावा.
७) आपल्या  घराच्या  नैऋत्य कोपऱ्यात अंधार ठेवावा.हे स्थान अधिक उंच व वजनदार असावे व ह्या अंधाऱ्याजागेत ९ बदाम काळ्या कपडयात बांधुन ठेवावेत.
८) प्रत्येक शनिवारी पिंपळाला गुळाचे गोड पाणी,काळे तीळ,काळे उडीद सहित पाणी ७ प्रदक्षिणा घालत सुर्योदयापुर्वी अर्पण करावे.
९) दररोज  सकाळी सुर्योदयापुर्वी  उठून अंथरुणातच दक्षिण दिशेला नमस्कार करून  श्रीशनिदेवांच्या १० नावांचे ११ वेळा जप करावा.
१०) सुर्योदयापुर्वी पिपळांच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
११) ज्या शनिवारी अनुराधा,पुष्य,उत्तरा भाद्रपदा नक्षत्रांपैकी कोणतेही नक्षत्र असेल त्या दिवशी  श्रीशनिदेवांच्या आवडत्या वस्तु दान कराव्यात. ह्या दिवशी श्रीशनिदेव मंत्राचा जप सुद्धा लाभदायक ठरतो.
१२) कोणत्याही शनिवारी काळा रेशमी धागा आपल्या उजव्या हाताच्या मनगटाला मंदिराच्या पुजाऱ्याकडून बांधुन घ्यावा.हा धागा श्रीशनि कृपेसाठी कमीतकमी ९ शनिवार असावा. काळा धागा आपल्या उजव्या हातात  बांधल्याप्रमाणेच आपल्या उजव्या पायाच्या अंगठयाला आणि उजव्या पायाला (पैंजनाप्रमाणे) कोणत्याही कन्येकडुन बांधुन घ्यावा. जितके जास्त दिवस ते राहील तेवढे श्रीशनि कष्ट कमी होईल.
१३) शनिवारी काळे वस्त्र अवश्य परिधान करावे.शनिवारी उडीदाची डाळ जेवणात अवश्य घ्यावी.चमेलीचे तेल केसांना लावुनच  घरातुन बाहेर पडावे.डोळ्यात काजळ किंवा  सुरमा जरूर घालावा. शनिवारी तेलापासुन तळलेले पदार्थ दान करावेत.स्वास्थ लाभासाठी  औषधे शनिवारपासुन घ्यायला सुरुवात करावी.
१४) शनिवारी उडदाची डाळ आणि तांदळाची मीठ घालुन खिचडी बनवुन त्याचे लाडु बनवावेत व ते कावळ्यांना खाऊ घाला व त्या आधी संकल्प करा कि किती शनिवार हा उपाय करणार आहात ते.
१५) प्रत्येक दिवशी सुर्योदयापुर्वी पिंपळाजवळ सरसोच्या तेलाचा दिवा लावावा.
१६) जन्मच श्रीशनि महादशेमध्ये झाला असेल किंवा वर्तमान काळात कोणतीही श्रीशनि दशा सुरु असेल तर खालील उपाय करावेत...
    अ) दररोज एक जपमाळ श्रीशनि पौराणिक मंत्राची अवश्य करावी.
    ब) उठल्यावर पश्चिम दिशेला प्रणाम करा व पश्चिम दिशेला नेहमीच उंच आणि स्वच्छ ठेवावे.
    क) प्रत्येक शनिवारी गरीब व्यक्तीला पोट भरून जेवण द्यावे.
    ड) प्रत्येक शनिवारी वृध्द लोकांना दक्षिणा देऊन त्यांचा आशिर्वाद घ्यावा.
    इ) प्रत्येक शनिवारी श्री शनि मंदिराला ८ प्रदीक्षणा घालाव्यात.
    ई) प्रत्येक शनिवारी ब्रम्हचर्यचे पालन करावे.          
                           २१) श्रीशनैश्चर अमावस्या कशी साजरी करावी.
श्रीशनैश्चर अमावास्येला जे पण काही उपाय, पुजा, दान केले जातात ते लगेच श्रीशनिदेवांकडुन स्वीकार केले जातात. श्रीशनैश्चर अमावास्येला जे उपाय केले ते इतर अमावास्येला केले जात नाहीत. 
१) प्रत्येक श्री शनैश्चर अमावास्येला श्री शनि मंदिरात जाऊन श्री शानिदेवांचे आवडते पदार्थ आटा, उडदाची डाळ, काळे चणे, तिळाचे लाडु, गुळ, काळे तीळ, मोठे मीठ, काळा कपडा, सरसोचे तेल प्रत्येकी पाव किलो घेवुन काळ्या कपडयात बांधुन त्याची पोटली बांधावी व ती पोटली श्रीशनि मुर्तीला स्पर्श करून आपल्या कुटुंबियांसाठी सुख समृद्धी, प्रगती, भरभराट, शांतीसाठी मनोभावे प्रार्थना करून तेथील ब्राम्हणास दान करावी.
२) श्रीशनैश्चर अमावास्येला मंदिराबाहेरील किंवा कोणत्याही गरीब व्यक्तीला भरपुर पोटभरून जेवण द्यावे. शक्य होईल तेवढे श्री शनि चाळीसा पाठ करावेत.                                              ३) आपले कोणतेही वापरलेली वस्तु कपडे किंवा चप्पल गरजु व्यक्तीला द्यावी व त्याने ती वस्तु वापरल्यावर त्याचे आशिर्वाद आपल्याला मिळावेत व त्या मुळे श्रीशनि पीडा कमी व्हावी अशी प्रार्थना श्रीशनिंना करावी. (शक्यतो काळी वस्तु असल्यास अधिक चांगली).
४) रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या चांभाराला काळ्या रंगाची छत्री दान करावी.
५) नवीन किंवा जीर्णोध्दारीत श्रीशनि मंदिरात लोखंडाची वस्तु दान करावी.
६) श्रीशनैश्चर अमावास्येला सरसोच्या तेलाचा दिवा सतत तेवत ठेवावा.
७) श्रीशनैश्चर अमावास्येला सरसोच्या तेलाचे ९ दिवे = मुख्य दरवाजाच्या बाजुला २, देवघरात १, छतावर १, तुलसीजवळ १, स्वयंपाक घराच्या पाण्याजवळ १, पिंपळाजवळ १  ठेवावेत.
८) जेवणामध्ये उडदाची डाळ, गुळ, तिळाचे पदार्थ, गोड पुरी बनवुन ते श्री शनिदेवांना अर्पण करून गाय, कावळा व काळ्या कुत्र्याला खाऊ घालावे व आपण सर्वांनी सुध्दा त्याचा प्रसाद म्हणुन लाभ घ्यावा.
                               २२) अमावस्या शांती उपाय 
अमावस्या श्री शनि महाराजांसाठी श्रेष्ठ मानली जाते. अष्टमीचा संबंध श्री शनि आणि राहु ह्या दोन्ही ग्रहांशी असल्याने त्याचे विशेष महत्व आहे.
दिपावालीचे श्रीलक्ष्मी पुजन हे दरवर्षी अमावस्येलाच असते म्हणुन श्रीशनि आणि माता श्रीलक्ष्मी हे एकमेकास पुरक आहेत. म्हणुन ज्यांच्यावर श्रीशनि कृपा आहे त्यांच्यावर माता श्री लक्ष्मीचि सुध्दा कृपा असतेच असते. श्रीशनिंना अमावास्येला माता श्री लक्ष्मीचा दर्जा मिळतो.
१) प्रत्येक अमावास्येच्या एक दिवस अगोदर घरातील व व्यवसायाच्या ठिकाणातील सर्व जाळ्या, घाण काढावी, फरशी पुसावी.
२) अमावास्येला सुर्योदयापुर्वी उठुन सर्व आवरून काळे वस्त्र घालुन श्रीशनिदेव आणि माता श्रीलक्ष्मीला एक तेलाचा आणि एक तुपाचा दिवा दाखवुन मिष्ठान्न अर्पण करावे.
३) अमावास्येला सर्वांनी सुर्योदयापुर्वी आंघोळ करून एकत्र बसावे व वेगवेगळ्या कटोरीमध्ये तेल घेवुन त्यात आपला चेहरा बघुन आपले कष्ट, बाधा, अडचणी, अडथळे, संकटे व व्यथा त्यांना बोलुन दाखवुन त्यापासुन मुक्तता मिळावी किंवा त्यातुन यशस्वी मार्ग मिळावा ह्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी नंतर सगळ्यांचे तेल एकत्र करून ते लोखंडाच्या/मातीच्या दिव्यात पिंपळाजवळ किंवा घरात जाळावे.    
४) अमावास्येला ५ प्रकारची धान्ये (गहु, काळा चना, काळे तीळ, काळे उडीद) एकत्र समप्रमाणात घेवुन त्याचे कणिक करून दिवे करावेत. त्यामध्ये सरसोचे तेल आणि कलाव्याची वाती घालुन श्री शनि मंत्र जपुन नवग्रहाची स्तुती करून ते दिवे – १ दिवा श्रीशनि देवासमोर, १ दिवा श्री हनुमानजवळ, १ दिवा पिंपळाजवळ, १ दिवा वडाजवळ, १ दिवा तुळसीजवळ, १ दिवा स्वयंपाक घराच्या पाण्याजवळ, १ दिवा देवाजवळ, २ दिवे मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजुला लावावेत.
                             २३) श्रीशनि शांतीसाठी पिंपळ पुजा 
१) दर शनिवारी सुर्योदयापुर्वी तांब्याच्या तांब्यात गुळ, काळे तीळ, काळे उडीद पाण्यात घेवुन (गुळाचे गोड पाणी) व ते पाणी पिंपळाला ७ प्रदीक्षणा घालत व श्रीशनि मंत्र जपत अर्पण करावे. पिंपळाखाली सरसोच्या तेलाचा दिवा लावावा व पिंपळाखालीच शिवजी आणि श्रीशनिंच्या नावाचा मंत्रजप केल्यास श्रीशनि देवांची अदभुत कृपा प्राप्त होते.
२) प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या पानावर काजळाने आपले कष्ट, बाधा, अडचणी, अडथळे, संकटे व व्यथा लिहावी व ते पान किंवा पाने वाहत्या पाण्यात सोडुन द्यावीत.
                            २४) नवग्रह शांती उपाय        
नवग्रह शांतीसाठी खालील वनस्पतींचा उपयोग केला जातो.
१) रुई(आक) २) धोतरा ३) अघाड़ा(अपामार्ग) ४) दुर्वा ५) वड(बरगद) ह्यांची मुळे घ्यावीत व ६) शमी ७) आंबा ८) उंबर(गुलर)                             
१) सुर्य - रुई  २) चंद्र - पळस  ३) मंगळ – खैर  ४) बुध – अघाडा  ५) गुरु – पिंपळ ६) शुक्र – उंबर ७) शनि – शमी ८) राहु – दुर्वा  ९) केतु – दर्भ                     
  पळस(पलाश)    रुई(आक)    अघाड़ा(अपामार्ग)    वड(बरगद)    उंबर(गुलर)        
 वरील सर्व गोष्टी एकत्र मातीच्या भांडयात घेवुन त्यामध्ये दुध, तुप, तांदुळ, दिर्नामुग, गहु, तीळ, गोपत्र, सरसोचे तेल, मध, ताक, ह्याच पात्रात घ्यावे व सर्वाना एकत्र करावे. शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या मुळामध्ये खड्डा काढुन त्या मडक्याला गाडावे नंतर त्या पिंपळाखाली किंवा मंदिरामध्ये जाऊन  
“ ब्रम्हामुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भुमीसुतो  बुधश्च गुरु शुक्र शनि राहु केतव सर्वे ग्रहा शांती करा भवंतु “  ह्या मंत्राचा १०,००० जप करावा त्यावेळी अनिष्ठ ग्रहांचा कुप्रभात कमी होतो. रोग, निर्धनता व दुर्भाग्य यापासुन मुक्ती मिळते.
           समजा पिंपळाचे झाड नाही मिळाले तर वडाच्या झाडाखाली सुध्दा गाडु शकतो व पिंपळ आणि वड ह्या दोन्ही झाडाखाली गाडु शकत नसेल तर घरातील ईशान्य कोपऱ्यात खड्डा काढुन त्यात हि सामुग्री गाडु शकतो व तिथे ७ तुळशीची झाडे लावुन मोठया झाडाचा आभास निर्माण करावा किंवा त्यावर तुळशी वृंदावन करावे आणि तिथे दिवा लावुन मंत्र जप करावा. वरील मंत्र जप केल्यास नवग्रह संबंधित कोणत्याही ग्रहाची पीडा असेल तर ती शांत होते. नवग्रह देवता शीघ्र प्रसन्न होतात.
                 वरील सर्व वनस्पतींच्या मुळ्या, पाने व पंचगव्य एकत्रित करून १०८ वेळा खालील मंत्राने हवन करावे
 सर्व ग्रह पीडा नाशन मंत्र – “ ॐ नमः भवे भास्कराय अस्माक “ अमुक ग्रह/सर्व ग्रह “ पीडा नाशनं कुरु कुरु स्वाहा “   
   जौ, तीळ, सरसोचे तेल, गहु, तांदुळ, मुग, काळा चना, शमी, आंबा, दुर्वा, कुश, अशोक, धोतरा  + दुध, दही, तुप, गोमुत्र, गोमय

                             २५) श्रीशनिंचे ३३ चे यंत्र व त्याचे महत्व  
       हे यंत्र तांब्याच्या किंवा लोखंडाच्या पत्र्यावर बनवले जाते. तांब्याच्या पत्र्यावर बनवलेले यंत्र दैनिक आराधनेत पुजेत वापरतात तर लोखंडाच्या पत्र्यावर बनवले यंत्राचा उपयोग दर शनिवारी तैलाभिषेक साठी वापरला जातो. ज्या शनिवारी श्रीशनिंचे कोणतेही नक्षत्र असेल त्या दिवशी हे यंत्र घरी आणावे. एका चौरंगावर काळा कपडा अंथरूण त्यावर स्टीलच्या प्लेटमध्ये गंगाजलाने यंत्र धुवुन ठेवावे त्यावर मग अक्षता कुंकू पुष्पाने पुजन करावे व त्यावर सरसोच्या तेलाने १०८ वेळा श्रीशनि मंत्र म्हणत अभिषेक करावा. नंतर ते तेल दुसऱ्या कटोरीत घ्यावे. ते यंत्र स्वच्छ पुसुन त्याची परत अक्षता कुंकू पुष्पाने दिव्याने पुजन करावे व श्रीशनि पीडा शांतीसाठी देवघरात स्थापन करावे. प्रत्येक शनिवारी श्रीशनि साढे साती, पनौतीचा त्रास कमी होण्यासाठी व आणि अमावास्येला थांबलेली कार्ये मार्गी लागण्यासाठी, बाधाये दुर होण्यासाठी असा तैलाभिषेक करावा व श्रीशनिदेव प्रसन्न होतात. तैलाभिषेक केलेले तेलात स्वताचा चेहरा बघुन आपल्या बाधा निवारणाची प्रार्थना करून आपल्या घरात लोखंडाच्या दिव्यात जाळावे.      
१२
१४
१३
११
१५
१०

    हे एक पीडा निवारण यंत्र आहे. श्रीशनि साढेसाती, पनौती, महादशा, अंतर्दशा ह्या काळातील सर्व कष्टांचे, संकटांचे, त्रासाचे निवारण करण्यासाठी हे यंत्र विशेष लाभदायक आहे.
१) समजा घरात खुप कलह होत असेल किंवा घरातील काही व्यक्तींमुळे घरातील संपुर्ण वातावरण खराब होत असेल तर तेंव्हा त्यांना सुधारण्यासाठी ज्यावेळी चपाती/रोटी बनवली जाईल त्यावेळी त्यावर श्री शानिमंत्राचा जप करत श्रीशनि ३३ चे यंत्र बोटाने बनवावे व ती चपाती किंवा रोटी त्या व्यक्तीला खायला द्यावी.
२) औषधाचे चुर्ण जर रुग्णाला द्यायचे असेल तर त्या चुर्णावर श्रीशनि देवांचे स्मरण करत भावनात्मक रीत्या श्रीशनि ३३ चे यंत्र काढावे व श्रीशनिंचे नाव घेवुन ते चुर्ण त्या रुग्णाला खावयास देणे, निश्चित लाभ होईल.
३) घरातील एखाद्या व्यक्तीमुळे घरातील वातावरणात कलह निर्माण होत असेल तर सुर्योदयापुर्वी दोन चपात्या त्या व्यक्तीच्या नावाने बनवाव्यात व त्यावर तेलाने श्रीशनि ३३ चे यंत्र काढावे. व सुर्योदयापुर्वी श्रीशनि मंत्र जपत/स्मरण करत ती व्यक्ती सुधारण्यासाठी प्रार्थना करत गायीला खाऊ घालावे.
४) अमावास्येच्या दिवशी मुख्य दरवाज्यावर शेंदुरामध्ये तेल घालुन श्रीशनि ३३ चे यंत्र काढावे मग त्याची विधिवत अक्षता, गंध, पुष्प, दिप धुपाने पुजा करावी. प्रति शनिवार, प्रति अमावास्येला ह्याच्या नावाने एक दिवा लावावा त्यामुळे घरात कोणतीही वाईट घटना घडत नाही, संकटे टळुन जातात.
५) एक काळा कपडा घ्यावा त्यावर शेंदुरात तेल घालुन त्या कपडयावर श्रीशनि ३३ चे यंत्र काढावे व त्या कपडयात बिना पाण्याचा नारळ घेवुन ज्या रुग्णाला औषध काम करत नसतील, जी व्यक्ती शारीरिक त्रासाने त्रस्त असेल त्या व्यक्तीच्या डोक्यापासुन पायापर्यंत ७ वेळा श्रीशनि देवांचे स्मरण करत/मंत्र म्हणत त्या व्यक्तीला आराम पडावा अशी प्रार्थना करत उतारा करावा व ते लगेच वाहत्या पाण्यात सोडुन द्यावा. हा उपाय अमावास्येला किंवा श्री शनैश्चर अमावास्येला केल्यास विशेष लाभ होतो. रुग्ण जर रुग्णालयात असेल तर हा उपाय शनिवारी करावा.           
 ६) पांढऱ्या कागदावर काजळाच्या शाईने श्रीशनि ३३ चे यंत्र काढावे. काळे तीळ, उडीद, सरसोच्या तेलाने यंत्राची पुजा करावी. मग ह्या यंत्रावर ह्या सगळ्या वस्तु थोडया थोडया ठेवाव्यात व त्याची पोटली बनवा. श्रीशनि पीडाग्रस्त व्यक्तीवरून त्याचा त्रास कमी व्हावा म्हणुन श्रीशनिंना प्रार्थना करून त्याच्या डोक्यापासुन पायापर्यंत ७ वेळा उतरवावे व ते वाहत्या पाण्यात किंवा जलाशयात सोडावे. पाण्यात सोडताना श्रीशनि देवांना प्रणाम करावा. हा प्रयोग सलग ११ शनिवार करणे.
७) एक काळा कपडा घ्यावा त्यावर शेंदुरात तेल घालुन त्या कपडयावर श्रीशनि ३३ चे यंत्र काढावे व त्या कपडयात बिना पाण्याचा नारळ घेवुन ज्या व्यक्तीला श्रीशनि साढेसाती, पनौती, महादशा, अंतर्दशा सुरु असेल त्या व्यक्तीच्या डोक्यापासुन पायापर्यंत ७ वेळा श्रीशनि देवांचे स्मरण करत/मंत्र म्हणत त्या व्यक्तीला त्या काळात त्रास होऊ नये अशी प्रार्थना करत उतारा करावा व ते लगेच वाहत्या पाण्यात सोडुन द्यावा. हा उपाय अमावस्या ते अमावस्या ७ अमावस्या करावयाचा आहे.    ८) लोखंडाच्या किंवा तांब्याच्या पत्र्यावर श्रीशनि ३३ चे यंत्र काढा व त्याला ८ वेळा श्रीशनि मंत्राने तेलाभिषेक करा व आता ते तेल दुसऱ्या कटोरीत घ्या व त्यात आपला त्यात आपला चेहरा बघुन आपले कष्ट, बाधा, अडचणी, अडथळे, संकटे व व्यथा त्यांना बोलुन दाखवुन त्यापासुन मुक्तता मिळावी किंवा त्यातुन यशस्वी मार्ग मिळावा ह्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी नंतर सगळ्यांचे तेल एकत्र करून ते लोखंडाच्या/मातीच्या दिव्यात घरात जाळावे व हा उपाय सलग ४० दिवस केल्यास निश्चित फायदा होतो.
९) शनिवारी भोजपत्रावर शेंदुराने श्रीशनि ३३ चे यंत्र काढावे व त्याची धुप, दिवा,अगरबत्ती ह्याने पुजा करावी व त्याला काळ्या कपडयात बांधावे व काळ्या धाग्याने शिवुन तावीज सारखे करावे व ते आपल्या सफलता, कार्यसिद्धी बाधा निवारण साठी शनिवारी आपल्या गळ्यात धारण करावा किंवा उजव्या हाताच्या दंडाला बांधावा. सलग १६ शनिवार लगातार बांधुन ठेवावे, खुप लाभ होईल.            
                          २६) शनिवारची उपासना 
१) प्रत्येक शनिवारी सुर्योदयापुर्वी पिंपळाला सरसोच्या तेलाचा दिवा लावावा व  पाण्यामध्ये गुळ,काळे तीळ, काळे उडीद घालुन ते पाणी श्रीशनि मंत्र म्हणत ७ फेरे लावत अर्पण करावे.
२) सुर्योदयापुर्वी किंवा सुर्यास्तानंतर श्रीशनि स्तोत्र, मंत्र व चाळीसाचा पाठ करावा.  
३) काळ्या गायीचे पुजन करा व गायीला काळे चणे आणि गुळ खायला द्या.
४) काळ्या कुत्र्याला आणि कावळ्याला सरसोच्या तेलात तळलेली गुळाची गोड पुरी द्यावी.    
५) भिकारी, अपंग, कोडी व्यक्तीला शनिवारी काळे वस्त्र, दैनंदिन जीवनात लागणाऱ्या लोखंडाच्या वस्तु दान कराव्यात.
६) आपल्या अधिकारातील कर्मचारी, नौकर, सेवकां बरोबर योग्य व्यवहार करावा.
७) प्रसिध्द श्री शनि शिंगणापुर, श्रीशनि तीर्थ बिरझापुर  किंवा कोणत्याही जागृत श्रीशनिस्थळी शनिवारी जाऊन अभिषेक करावा. आपल्या स्थानिक श्रीशनि मंदिरात जाऊन सुध्दा तेलाभिषेक करावा.
८) शनिवारी कोणत्याही विशेष कामाच्या सफलते साठी उपवास ठेवु शकता. जर कोणत्याही कामात बाधा येत असेल, श्रीशनि साढेसाती, पनौती, महादशा, अंतर्दशा सुरु असेल एक किंवा अनेक शनिवारचा उपवास संकल्प करून बाधा,अडचण,अडथळे निवारणासाठी धरावा. त्या शनिवारी एकच वेळ जेवण करावे व ज्या एक वेळच्या जेवणाचा त्याग केला असेल ते जेवण गरिबाला, भिकाऱ्याला दान द्यावे व अशी श्रीशनि देवांना प्रार्थना करा कि ते जेवण जेवणाऱ्या व्यक्तीचा आपल्याला आशिर्वाद लाभो.
९) शनिवारी श्रीशनि मंत्रांचा जास्तीत जास्त जप करावा.
१०) शनिवारी सुर्योदयापुर्वी श्रीशनि मंदिरात जाऊन सरसोचा दिवा लावावा.
११) कोणतेही शुभ कार्य किंवा प्रवास शनिवारी किंवा शनिवार पासुन करावे.
१२) प्रत्येक शनिवारी सुर्योदयापुर्वी पिंपळाला सरसोच्या तेलाचा दिवा लावावा व  पाण्यामध्ये गुळ,काळे तीळ, काळे उडीद घालुन ते पाणी श्रीशनि मंत्र म्हणत ७ फेरे लावत अर्पण करावे. कच्च्या धाग्याने/सुताने पिंपळाच्या झाडाला ७ फेरे घालुन कष्ट, बाधा, अडचणी, अडथळे, संकटे व व्यथा त्यांना बोलुन दाखवुन त्यापासुन मुक्तता मिळावी किंवा त्यातुन यशस्वी मार्ग मिळावा ह्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी व तो कच्चा धागा बांधावा.
१३) शनिवारी क्रोध करू नये, शांत राहण्याचा प्रयत्न करावा.
१४) शनिवारी तेल आणि लोखंड खरेदी करू नये.
१५) शनिवारी काळी गाय, काळी म्हैस, काळा रेडा, काळा कुत्रा, कावळा ह्यांना सुध्दा काहीतरी खायला द्यावे.
१६) शनिवारी श्रीशनि ह्यांचे पुष्य, अनुराधा आणि उत्तरा भाद्रपदा ह्यापैकी कोणतेही नक्षत्र असेल तर गरिबांना किंवा गरजुंना शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त अन्न दान करावे खुप लाभ होतो.
१७) शनिवारी जास्तीत जास्त श्री हनुमानची उपासना करावी, श्री हनुमान चाळीसा, हनुमानाष्टक, बजरंग बाण, पंचमुख हनुमंत कवच ह्याचा सुध्दा पाठ करावा.        
                  २७) श्रीशनि साधनेसाठी काय वापरावे आणि पुजा महत्व 
श्रीशनिदेवांची पुजा करण्यासाठी काळ्या कांबळ्याच्या आसनावर बसुन काळे वस्त्र परिधान करून केशरिया वस्त्र खांद्यावर ठेवुन श्रीशनि पुजा करावी. 
श्रीशनिदेवांची पुजा आराधना नेहमी पुर्व जन्माचे पाप, अपराधांची क्षमा करण्याच्या हेतुने व तसेच वर्तमान काळात संकटापासुन वाचण्यासाठी, तसेच वर्तमान काळात काही बाधा, संकटे, अडचणी, अडथळे दुर होऊन एक यशस्वी मार्ग होण्यासाठी केला जातो. 
                    २८) श्रीशनिच्या १९ वर्षाच्या महादशेत    
 महामृत्युंजय जप करावा, श्रीशनि मंत्र जप करावा, नीलम धारण करा, ब्राम्हणाला सरसोचे तेल, काळे उडीद, म्हैस, लोखंड, काळे तीळ, काळे वस्त्र, काळी गाय, चप्पल, कस्तुरी, सोने दान करायला पाहिजे. खालील पैकी कोणताही श्रीशनि मंत्र चालेल.
पौराणिक मंत्र – निलांजन
वैदिक मंत्र -  ॐ शन्नो
बीज मंत्र – ॐ प्रां
सामान्य मंत्र – ॐ शं
ह्यापैकी कोणताही मंत्र संकल्प घेवुन २३ दिवसात संपवावा. रोज १० माळा कराव्यात. जप करताना मौन धारण करावे, एकाच जागेवर बसावे, एकाच वेळेला मंत्रजप करावा. अगोदर ब्रम्हदेवाला स्मरण करावे, त्यांचे आवाहन करावे. त्यांना मानसिक रूपे नमस्कार करावा.                                         २९) श्रीशनि छाया दान साधना  
  शनिवारी लाकडाच्या चौरंगावर काळा कपडा अंथरा व त्यावर स्टीलच्या प्लेटमध्ये श्रीशनि यंत्र ठेवुन त्यावर श्रीशनि पौराणिक मंत्र २१ वेळा म्हणत सरसोच्या तेलाचा अभिषेक करावा. नंतर ते तेल दुसऱ्या कटोरीत घेवुन त्यात आपला चेहरा बघुन आपले कष्ट, बाधा, अडचणी, अडथळे, संकटे व व्यथा त्यांना बोलुन दाखवुन त्यापासुन मुक्तता मिळावी किंवा त्यातुन यशस्वी मार्ग मिळावा ह्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी व त्यात एक लोखंडाचा खिळा दान स्वरूप टाकावा व ते तेल पिंपळाला वाहावे, तीळ गुळाचा नैवेद्य दाखवावा. शनिवार ते शनिवार असे ९ शनिवार करणे व शेवटच्या शनिवारी ती चेहरा बघितलेली कटोरी सुध्दा पिंपळाजवळ ठेवावी. ह्या प्रयोगाने श्री शानिदेव कठीण मधील कठीण परिस्थिती सुध्दा सोपी करतात.     
                          ३०) आर्थिक कष्ट निवारण हेतु उपाय
  सामग्री
१) श्री यंत्र, श्री गणपती मुर्ती, शिवलिंग, माता श्रीलक्ष्मीची मुर्ती, श्रीहनुमान मुर्ती असेल तर हे जीवनभरासाठी श्रीशनि उपासनेसाठी श्रेष्ठ मानले जाते. मुर्ती नसेल तर प्रतिमा ठेवाव्यात.
२) एक मीटर लाल कपडा, एक मीटर काळा कपडा.
३) दोन लाकडाचे चौरंग, कुश आसन.
४) दोन कलश.
५) पाणी वाले दोन नारळ, काळी हकिक माळा
६) पंचमेवा, मिठाई, फळ, गुळ, काळे तीळ, काळे उडीद, सरसोचे तेल, तुप
७) एक पितळेचा आणि एक लोखंडाचा दिवा.
८) रुई, मौली धागा, काळा रंग, कुंकु, चंदन, लाल चंदन, अक्षता, फुल, धुप, सुपारी, अगरबत्ती, सेंट, लवंग, इलायची, काळी आणि पिवळी हळद, खाऊची पाने, दक्षिणा.
९) ताजा प्रसाद – उडदाचे वडे, गुळ घातलेली पुरी, भिजवलेले तळलेले चने, गुळ तिळाचे लाडु, उडद डाळ आणि तांदळाची खिचडी, हे सर्व पदार्थ थोडे थोडे करून एका प्लेटमध्ये घेवुन श्रीशनि देवांना नैवेद्य दाखवावा.
१०) काळा झेंडा लाकुड लावुन आसनाजवळ ठेवावा.
११) १०० ग्रॅम काळ्या अक्षता.
१२) एक किलो साखर.
१३) पाणी आणि गंगाजल.
१४) काळा धागा.
१५) काळा नॅपकीन.
१६) प्लेट, कटोरी, थाळी, पातेली.        
  पुजन कधी करावे.
 ज्या दिवशी पुष्य, अनुराधा, उत्तरा भाद्रपदा पैकी कोणतेही नक्षत्र असेल त्यादिवशी हि पुजा चालु करावी.
पुजा विधी :-
        एका चौरंगावर लाल कपडा अंथरून त्यावर श्री गणेश, माता श्रीलक्ष्मी, श्री हनुमान, शिवजी ठेवावे. श्री गणेश व माता श्रीलक्ष्मी आजुबाजुला पश्चिमेला तोंडकरून, शिवलिंग उत्तरेला आणि श्रीहनुमानजीचे तोंड दक्षिणेला ठेवावे. बाजुला तांब्याच्या तांब्यात पाणी घेवुन त्यावर नारळ ठेवावा. व त्यासमोर पितळेचा दिवा तुप घालुन लावावा. व उजव्या बाजुला ४ वातीचा सरसोच्या तेलाचा लोखंडाचा दिवा लावावा.
       दुसऱ्या चौरंगावर काळा कपडा अंथरावा व त्यावर एक मोठी प्लेट ठेवावी व त्यात श्रीशनि यंत्र ठेवावे. त्या यंत्रासमोर उडीद डाळीचे वडे, गुळ तिळाचे लाडु, गोड पुऱ्या, उडीद डाळ खिचडी ह्या सर्व गोष्टी थोडया थोडया एका प्लेट मध्ये घेवुन नैवेद्य दाखवावा व कोणत्या गोष्टी साठी हा विधी करत आहोत त्याच्या फलप्राप्तीसाठी प्रार्थना करून पाणीवाला नारळ वाढवावा व त्याच्या दोन्ही तुकडयात साखर घालुन व ते प्रत्येक चौरंगावर एक एक तुकडा ठेवावा. संपुर्ण पुजा झाल्यावर एक तुकडा पिंपळाखाली साखरेचा भाग वर करून गाडावा व दुसरा तुकडा वडाच्या झाडाखाली गाडावा.
आता विधीसाठी संकल्प करावा....   
 ध्यान :- कलश, दिवे व मुर्तींना कुंकवाचा टिळा लावावा. हातात अक्षता आणि फुल घेवुन खालील मंत्र क्रमवार म्हणावेत आणि अक्षता फुल श्रीगणेशासमोर अर्पण करावेत.
१) ॐ गुरवे नम: २) ॐ गणपतये नम: ३) ॐ महालक्ष्मै नम: ४) ॐ नम: शिवाय ५) ॐ भं भैरवाय नम: ६) ॐ हं हनुमते नम: ७) ॐ शं शनैश्चराय नम: ८) ॐ नवग्रह देवताभ्यो नम: ९) ॐ वास्तु देवताभ्यो नम: १०) ॐ सर्वे देवेभ्यो नम:
श्रीशनि देवताचे आवाहन:-  हातात काळ्या अक्षता आणि फुल घेवुन श्रीशनि मंत्र म्हणावा आणि त्या अक्षता आणि फुल श्रीशनि यंत्रासमोर अर्पण करावे.
             ।। सुर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्ष: शिवप्रिय: । मंदचारा: प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनि: ।। 
  श्रीशनिदेवांची स्तुती :- ।। ॐ नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम । छायामार्तंड संभुतं तं नमामि शनैश्चरम ।।
  आसन समर्पण:- पायावर काळा कपडा अर्पुण ‘ॐ श्री शनैश्चर देवता ’ आसन समर्पयामि  असे म्हणावे.               
  पाद्य समर्पित :- पाद्य हेतु पायावर ३ चमचे पाणी अर्पण करा व म्हणा कि ॐ श्री शनैश्चर देवतापाद्य समर्पयामि.         
  अर्ध्य समर्पण:- अर्ध्य हेतु पायावर ३ चमचे पाणी अर्पण करा व म्हणा कि ॐ श्री शनैश्चर देवताअर्ध्य समर्पयामि.                
  आचमन:- आचमन हेतु पायावर ३ चमचे पाणी अर्पण करा व म्हणा कि ॐ श्री शनैश्चर देवताआचमन समर्पयामि.
   स्नान:- श्रीशनि पौराणिक आणि बीज मंत्र म्हणत पाव किलो सरसोच्या तेलाने स्नान घालावे व शेवटी म्हणावे कि ॐ श्री शनैश्चर देवतातेल स्नान  
           समर्पयामि. 
   वस्त्र:- ह्यानंतर ते यंत्र बाहेर काढुन स्वच्छ पुसुन घ्यावे व त्याला काळा नॅपकीन अर्पण करा व म्हणा कि ॐ श्री शनैश्चर देवतावस्त्र समर्पयामि.
  नैवेद्य:- फळे, मिठाई, नैवेद्य खाऊच्या पानावर ठेवुन नैवेद्य दाखवावा व नंतर पानावर लवंग, वेलची ठेवुन त्या सर्व पानाभोवती पाण्याने परिक्रमा करावी.  
  कापुर आरती:- कापुर आरती करा, आरतीला पाणी दाखवा व काळ्या माळेवर १ माळ पौराणिक श्रीशनि मंत्राचा जप करावा. अक्षता पुष्प अर्पुण      
           चुकांची क्षमा याचना करावी, जो नैवेद्य दाखवला होता त्यातील थोडासा प्रसाद घरच्यांनी खावा व बाकी पोटभर नैवेद्य/जेवण एखाद्या       
          गरिबाला/गरजुला श्रद्धापुर्वक द्यावे. दक्षिणा अर्पण करून ती दक्षिणा श्रीशनि मंदिरात किंवा श्रीहनुमान मंदिरात दानपेटीत दान करावी. असा विधी  
         वर्षातुन दोनदा केल्यास सुख, समृद्धी, शांतीची कधीच कमतरता भासत नाही. आर्थिक संकट आपोआप दुर होतात.   
                               ३१) श्री शनि चिकित्सा:-
   लोखंडाचा व्यापार,कोळशाचा व्यापार, पेट्रोल, डिझेल, तेलाचा व्यापार, मेडीकल, मशिनरी, फॅक्टरी, वाहन, ट्रान्सपोर्ट, गॅरेज, मेकॅनिक, ऑटोपार्टस, काळ्या वस्तुंचा वापर, चिकीत्सा क्षेत्र, कोर्ट कचेरी संबंधित वकील, न्यायाधीश,अध्यात्म संबंधित कोणतेही मिशन चालवण्याच्या संबंधित, हार्डवेअरचा व्यापार हे सर्व व्यापार श्रीशनिच्या अधिपत्याखाली येतात.जर हे सर्व व्यवसाय व्यवस्थित चालत असतील तर श्रीशनिदेवांची कृपा आहे हे समजावे अन्यथा नाही.जर वरील व्यवसाय बंद करण्याची वेळ येत असेल तर श्रीशनिदेवांचा प्रकोप आहे असे समजावे.
शुगर, लकवा, उजव्या अंगाची पीडा, वात, संधिवात, गॅस्ट्रीक अॅटॅक, किडनी रोग, पायांचे वारंवार फाटणे, उडीद डाळ, तळलेले पदार्थ न पचणे, काळा रंग वापरल्यास वारंवार त्रास होणे, लोखंडापासुन वारंवार इजा होत असेल तर श्रीशनिदेवांचा प्रकोप समजावा.
   त्यावेळी श्रीशनि पीडा निवारण हेतु मंत्र तंत्र इत्यादींच्या सहाय्याने उपाय करणे अनिवार्य आहे.
  श्री शनि पीडा निवारण मंत्र :-   
 अ) पौराणिक मंत्र          - ।। ॐ नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम । छायामार्तंड संभुतं तं नमामि शनैश्चरम ।।   
 ब) वैदिक मंत्र               - ।। ॐ शन्नो देवीर भिष्टये आपो भवन्तु पीतये शन्यो रभिस्त्रवन्तु नमः।। 
 क) बीज मंत्र/तांत्रोक्त मंत्र - ।। ॐ प्रां प्रीं प्रौं सं शनैश्चराय नमः ।।   
                                 - ।। ॐ ऐं ऱ्हीं श्रीं शनैश्चराय नम: ।।
 ड) श्रीशनिदेव लघु मंत्र   - ।। ॐ श्रीशनैश्चराय नम: ।।
 इ) श्रीशनि गायत्री मंत्र    - ।। ॐ भगभवाय विद्महे मृत्युरूपाय धीमही तन्नो शनि: प्रचोदयात ।।

१) ज्यावेळी शारीरिक कष्टाची पीडा असेल, तन आणि मनावर श्रीशनि पीडा असेल व मानसिक त्रासाने ग्रस्त असाल तर वरील पैकी श्रीशनिदेव लघु मंत्राचा जप चालता फिरता, कोणतेही काम करता करायला पाहिजे.   २) ज्यावेळी श्रीशनि साढे साती किंवा पनौती चालु असेल त्यावेळी श्रीशनि बीज मंत्र/तांत्रोक्त मंत्राचा श्रीशनि साढे साती किंवा पनौती काळात शुभफळ मिळण्यासाठी सतत जप करायला पाहिजे. ३) ज्यावेळी श्रीशनि महादशा किंवा अंतर्दशा चालु असेल किंवा कोणतेही काम रखडलेले असेल तर ह्या मंत्राचा जप करावा. अति भारी संकट असेल तर ह्या मंत्राचा २३००० जप २३ दिवसात करावा. ४) वैदिक मंत्र- ह्याने श्रीशनि शांती यज्ञ करावा. ५) श्री गायत्री मंत्र- संपुर्ण परिवाराच्या सुख शांतीसाठी ह्या मंत्राचा पाठ करावा.   
                                  ३२) श्रीशनि चित्र महिमा   
                            श्रीशनि देवांच्या चित्राने होणारे लाभ
१) एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत वारंवार दुर्घटना होत असतील, त्याला जखम होत असतील तर त्याने खिशात श्रीशनि चित्र ठेवावे, जखम नाही होणार.  
२) जर आपल्या गाडीची वारंवार दुर्घटना होत असेल व त्याचेच नुकसान होत असेल तर त्याने त्याच्या गाडीत श्रीशनि चित्र फ्रेम करून लावावे. वारंवार   
     दुर्घटना नाही होणार.
३) जर घराला किंवा व्यापाराला नजर लागली असेल तर, मानसिक कष्टाचा अनुभव येत असेल तर श्रीशनि चित्र फ्रेम करून अशी लावावी कि त्यांचे तोंड
    पश्चिमला ह्योईल.
४) घरात वरच्या हवेचा, भुत प्रेत बाधांचा त्रास होत असेल तर मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजुला हे श्रीशनि चित्र लावावे.
५) काळ्या दुपट्ट्यावर/ओढणीवर श्रीशनि चित्र छापावे व ती ओढणी परिधान करावी. श्रीशनि देवांची कृपा राहते, शारीरिक पीडा कमी होते.
६) जर एखाद्याला वाईट स्वप्न पडत असेल तर त्याच्या डोक्याजवळ श्रीशनि चित्र लावावे किंवा श्रीशनि दुपट्टा गळ्यात मफलर सारखा घालुन झोपावे
     किंवा दुपट्टा डोक्याजवळ ठेवुन झोप वाईट स्वप्ने येणार नाहीत.
७) काळ्या कपडयावर श्रीशनि चित्र छापावे व ते आपल्या खिशात रुमालासारखे ठेवावे. श्रीशनि देवांची कृपा राहते, बिघडलेली कामे मार्गी लागतात.
८) पुजा आराधना करताना श्रीशनि चित्र वाली ओढणी परिधान करावी त्यामुळे पुजेमध्ये मन लागते, अध्यात्म अधिपती श्रीशनिदेवजींच्या कृपेने शीघ्र
    धार्मिक कार्यात सफलता मिळते.
९) कुणावर औषध करत नसेल तर त्यांना श्रीशनि दुपट्टा परिधान करा त्यामुळे औषध काम करेल आणि झोपही चांगली येईल.
१०) लांबच्या प्रवासाला श्रीशनि दुपट्टा आपल्या जवळ ठेवा, प्रवास सुखद होईल.
११) एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल, नजर लागत असेल, मनात घाबरटपणा व बेचैनी रहात असेल, मन सतत भयभीत रहात असेल, कोणी
    लोकांच्या समोर बोलायला घाबरत असेल, गर्दी मध्ये जायला घाबरत असेल, मनाची निर्बलता वाढलेली असेल तर अशा वेळी श्रीशनि दुपट्ट्याचा
    आपल्या शरीरावर ज्यास्तीत जास्त वापर केला पाहिजे.             
                                ३३) श्रीशनि शांती ज्योती 
  १) एका कटोरीत काळे मीठ व तेल घ्या त्यात आपला चेहरा बघुन आपला त्रास, बाधा, परेशानी सांगा व वारंवार कष्ट निवारणासाठी प्रार्थना करा व त्या तेलाला तांब्याच्या दिव्यात कापसाची वात घालुन तो दिवा तेल संपेपर्यंत तेवत ठेवावा, त्यात तेल टाकु नये.
२) कोणतेही अडकलेल्या मोठया कामासाठी ४० दिवस सतत मंदिरामध्ये तेलाचा दिवा तेवत ठेवण्याचा संकल्प करून तो तेवत ठेवावा. ४० दिवस पुरेल इतके तेल दान करावे व ज्योतीचे दर्शन घेण्यासाठी दररोज मंदिरात जावे. जर मंदिरात दिवा लावणे शक्य नसेल तर घरात श्रीशनि देवांच्या प्रतिमेसमोर मातीच्या दिव्यात कापसाची वाती करून तो दिवा सतत ४० दिवस तेवत ठेवावा. हा दिवा एकच कामासाठी एकच वेळ जळेल व त्यानंतर तो नदीमध्ये विसर्जित करावा.
३) प्रत्येक शनिवारी आपल्या प्रत्येक कामाच्या सफलतेसाठी प्रार्थना करून बाधा निवारणासाठी पाणीवाला नारळ फोडावा, त्या नारळाचा लहान तुकडयाचा नैवेद्य दाखवुन प्रसाद वाटावा व दुसऱ्या मोठया तुकड्यात तेल घ्यावे, ६-७ इंचाचा काळा पातळ कपडा घेवुन त्यात एक मुठ काळे तीळ घ्यावेत व त्याला काळ्या कलाव्याने त्या काळ्या कपडयाला पोटलीप्रमाणे शेवटपर्यंत वातीसारखे बांधावे. त्या पोटलीला तेलात बुडवुन त्या अर्ध्या नारळात घालावे व त्यावर कापुर ठेवुन त्याला जाळावे व तो नारळ पुर्ण जाळावा. हि ज्योती बाधा निवारण साठी श्रीशनि मंदिरात, श्रीहनुमान मंदिरात, पिंपळाजवळ, वडाजवळ जाळावी.
४) प्रत्येक अमावास्येला पंचधाण्याचे (गहु, तांदुळ, जवस, काळे उडीद, काळा चना) कणिक बनवुन त्याचे ९ दिवे बनवावे व त्यात सरसोच्या तेलात पंचरंगी मौली (कलावा) धाग्याची वाती करून घराच्या सुखसमृद्धीसाठी एक दिवा श्रीशनि मंदिरात, एक श्रीहनुमान मंदिरात, एक पिंपळाजवळ, एक तुळसीजवळ, एक घरातील मंदिरात, दोन मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजुला, एक छतावर ठेवा श्री शनिदेव प्रसन्न होतात.                        
                          ३५) श्रीशनि शांती उतारा  
उताऱ्याचा अर्थ कुठल्याही त्रासाला फेकुन देणे किंवा जुन्या वस्तु उतरवुन नवीन वस्तु परिधान करणे, कष्ट मुक्त होणे. हे उपाय शारीरिक मानसिक पिडेवर, ग्रह दोष शांतीसाठी खुप सहाय्यक होतात. पण हा उतारा योग्य रीतीने झाला पाहिजे तर त्याचा उपयोग होतो अन्यथा नाही.
     हा उतारा नेहमी उजवीकडुन डावीकडे गोल गोल फिरत डोक्यापासुन पायापर्यंत ७ वेळा झाला पाहिजे. हा उतारा करून झाल्यावर तो आपल्या घरातील कुणीही किंवा स्वत: त्याचा वापर करू नये.
१) अर्धा किलो उडीद डाळ, अर्धा किलो काळे तीळ, अर्धा किलो गुळ, ७ नाणी, ७ लोखंडाचे तुकडे, ७ मुठ्ठी कच्चा कोळसा, ७ बिना पाण्याचे नारळ, वरील सर्व सामान १ मीटर X १ मीटर काळ्या कपडयात बांधुन त्याची पोटली बनवावी व ती पोटली दुसऱ्याला देवुन आपल्या शरीरावरून डोक्यापासुन पायापर्यंत शरीराला स्पर्श करत उजवीकडुन डावीकडे फिरवत ७ वेळा उतारा करावा व उतारा करतेवेळी श्रीशनि देवांचा सतत जप करावा व शोक, भय, बाधा, अनिष्ट दुर होण्यासाठी प्रार्थना करावी, उताऱ्यानंतर हि पोटली वाहत्या पाण्यात सोडुन द्यावी. हा उतारा फक्त श्रीशनि अमावस्येलाच करावा. एका वेळची सामुग्री फक्त एकाच व्यक्तीसाठी वापरावी.
२) अर्धा मीटर पांढरे कापड घ्यावे त्यावर काजळाने श्रीशनि ३३ चे यंत्र काढुन त्यावर बिना पाण्याचा नारळ ठेवुन त्याची पोटली बांधावी. मग आपल्या शरीरावरून ७ वेळा उतारा करावा व उतारा करतेवेळी श्रीशनि देवांचा सतत जप करावा व शोक, भय, बाधा, अनिष्ट दुर होण्यासाठी प्रार्थना करावी, उतारा  करून झाल्यावर पाण्याकडे पाठ करून उभे राहावे व जा शनिदेव म्हणत मागे वाहत्या पाण्यात सोडुन द्या. हा उपाय प्रत्येक अमावास्येला श्रीशनि साढेसाती, पनौतीच्या उपयोगी आहे.
३) अर्धा मीटर पांढऱ्या कपडयावर काळ्या रंगाने “ ॐ शं शनैश्चराय नम: ” लिहुन त्यावर अर्धा किलो काळे चणे ठेवा. आपल्या शरीरावरून ७ वेळा उतारा करावा व उतारा करतेवेळी श्रीशनि देवांचा सतत जप करावा व शोक, भय, बाधा, अनिष्ट दुर होण्यासाठी प्रार्थना करावी व ती पोटली बावडी किंवा विहिरीत टाकावी व टाकतेवेळी पोटलीची गाठ सैल करावी व ती आत गेल्यावर ती आपोआप सुटली पाहिजे. हा उपाय फक्त शनिवारी कराव्यात.
४) ज्या शनिवारी पुष्य, अनुराधा, उ. भाद्रपदा नक्षत्र असेल त्याच्या आदल्या दिवशी अर्धा किलो काळे उडीद व अर्धा किलो काळे उडीद एकत्र भिजवा व  दुसऱ्या दिवशी त्यात एक किलो गुळ बारीक करून घालावा. व हे सर्व समान प्लास्टिकच्या पिशवीत घालुन आपल्या शरीरावरून ७ वेळा उतारा करून काळ्या रेडयाला किंवा म्हैशीला खायला द्या. हा उपाय मनोकामनापुर्तीसाठी केला साठी केला जातो.
५) प्रात: सकाळी सुर्योदयापुर्वी स्नान करून गव्हाच्या दोन चपात्यावर तेल लावुन त्यावर गुळ ठेवावा. हा नैवेद्य श्री शनि देवांच्या यंत्रासमोर किंवा प्रतिमेसमोर ठेवुन श्रीशनि बीज मंत्राची एक माळ जप करावी. हा उपाय संकल्पित अडकलेल्या कामासाठी करावा. कोणत्याही ग्रह शांतीचा उपाय उताऱ्याशिवाय होत नाही. हा ठेवलेला नैवेद्य आपल्यावरुन ७ वेळा उतारा करून गायीला खायला द्यावा. असे लगातार ९ शनिवार करावे.
६) शनिवारी प्रात: सकाळी सुर्योदयापुर्वी स्नान करून श्रीशनि शांतीसाठी व येणाऱ्या संकटापासुन वाचण्यासाठी गव्हाच्या दोन चपात्यावर तेल लावुन मौन व्रत ठेवुन त्याचा ७ वेळा शरीरावरून उतारा करावा व त्या चपात्या काळ्याच कुत्र्याला खायला द्याव्यात. असे सलग ९ शनिवार करावेत.
७) लोखंडाच्या मोठया कटोरीत ५० ग्रॅम तेल घ्या त्यात ७ काळे चणे, ७ दाणे उडीद, चुटकीभर काळे तीळ, चुटकीभर सरसोचे तेल, ७ दाणे काळी मिरची आणि ७ दाणे जवसाचे घालावेत. त्यात आपला चेहरा बघा व शोक, भय, बाधा, अडचणी, अडथळे, शारीरिक, मानसिक त्रास,अनिष्ट दुर होण्यासाठी प्रार्थना करावी व त्याचा ७ वेळा शरीरावरून उतारा करावा. सव्वा रुपया व तो उतारा श्रीशनि मंदिरात दान करावे.
८) शनिवारच्या आदल्या दिवशी किंवा अमावास्येच्या आदल्या दिवशी ३ किलो देशी चणे भिजेत ठेवावे व शनिवारी ते उकडुन घ्यावेत व त्यात काळे मीठ घालावे व त्या सर्वाचे वेगवेगळे ५ भाग करावे व त्याचा आपल्या वरून वेगवेगळा ७ वेळा उतारा श्रीशनि मंत्र म्हणत काढावा. त्यातील एक भाग रेड्याला, एक भाग काळ्या गायीला, एक भाग माकडांना, एक भाग कावळ्यांना व शेवटचा भाग चार रस्त्यावर ठेवावा. हा उपाय कोणत्याही अमावास्येला सुर्योदयापुर्वी किंवा सुर्यास्तानंतर ९ च्यानंतर करावा.
९) शनिवारी तांब्याच्या तांब्यात पाणी घेवुन त्यात सौंफ, खसखस, लोबान, सुरमा, काळे तीळ, गोंद, काळे उडीद घालुन आपल्या शरीरावरून ७ वेळा उतारा करावा व उतारा करताना श्रीशनि पीडा कमी होण्यासाठी शोक, भय, बाधा, अडचणी, अडथळे, शारीरिक, मानसिक त्रास,अनिष्ट दुर होण्यासाठी प्रार्थना करावी. व नंतर ती सामुग्री पिंपळावर अर्पण करावे व त्यातील थोडे जल स्वतावर पण सिंचित करावे.
   दर वर्षी मकर संक्रांतीला वरील सर्व सामुग्री आंघोळीच्या पाण्यात मिसळुन त्याने आंघोळ करावी. असे केल्याने पापांचे प्रायश्चित होते आणि देवकृपा होते.                                
                     ३६) आपला भाग्योदय होण्यासाठी 
१) आपला जन्मांक भाग्यांक नुसार कोणतेही काम करा.
२) आपल्या कपडयांचे परिधान, केसांची रचना ग्रहांनुसारही करावे.
३) लग्नेशच्या संबंधित रंगाचा टिळा, तिलक, बिंदी लावावी.
४) आपल्या हस्ताक्षराला प्रभावी बनवा.
५) षष्ठेश आणि अष्टमेश राशींच्या लोकांबरोबर कधीही मित्रता करू नका.
६) दरवाज्याच्या आसपास कचरा कुंडी ठेवु नका.
७) नखे किंवा खांद्याचे केस जमिनीवर किंवा कचऱ्यात टाकु नका. त्यांना पाण्यात टाका मग फेकुन द्या.
८) डोक्याला सरोसोचे तेल लावल्याने ते नकारात्मक उर्जा नष्ट करते. केस तुटणे, गळणे किंवा खांद्याच्या केसांना फेकण्याचा दोष लागत नाही.
९) आपल्या पत्रिकेतील श्रेष्ठ आणि उच्च ग्रहांचे रंग वापरावेत, नीच किंवा कमजोर ग्रहांचे रंग तुम्हाला अडचणीत आणतील.
१०) घरातुन बाहेर जाताना सर्व सामान व्यवस्थित लावुन जाने नाहीतर दिवसभर नकारात्मक उर्जा साठत जाते.
११) श्रीशनि यंत्र, काळी हळद, काळ्या घोडयाची नाल, काळा झेंड्याला आपल्या घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी अवश्य स्थान द्यावे.    
  बंधन दोष निवारण:-
  ज्या शनिवारी पुष्य, अनुराधा, उ. भाद्रपदा नक्षत्र असेल त्या दिवशी आपल्या घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लिंबु, चिंच अग्निमध्ये जाळुन त्याचा   
  धुर द्यावा व त्याची राख विहीर, तलाव किंवा नदीमध्ये टाकावी. सगळ्या बंधन दोषचा परिणाम निघुन जाईल.   
  चार रस्त्याचा उपाय:- 
 अ) जर एखाद्या व्यक्तीला कोणतेच औषध लागु पडत नसेल व सतत आजारी रहात असेल तर प्रत्येक शनिवारी सकाळी ९ ते १० च्या दरम्यान शेणाचा लाडु बनवुन त्यावर दही भात ठेवावा व त्यावर कापुर जाळावा शरीरावरून ७ वेळा उतारा करून चार रस्त्यावर फेकुन द्यावा. तब्ब्येतीत सुधारणा होत जाईल.      
ब) लगातार ७ शनिवार १ बुंदीचा लाडु, ५ बत्ताशे,१ लिंबु,१ हिरवी मिरची,१ लोखंडाचा खिळा घ्या व त्या सर्वांना कुंकू लावा. घराच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीला स्पर्श करून ७ वेळा उतारा करावा ( उतारा करताना श्रीशनि मंत्र म्हणावेत व पीडा, शोक, भय, बाधा, अडचणी, अडथळे, शारीरिक, मानसिक त्रास,अनिष्ट दुर होण्यासाठी प्रार्थना करावी ) ह्याने घरात शांती आणि व्यापार ठीक चालायला लागेल. हा उपाय रात्री ८ च्या नंतरच करावा.
क) अमावास्येला ८ पंचमुखी रुद्राक्ष, ८ लवंग, ८ वेलची, ८ बदाम, ८ लिंबु, ८ काळ्या मिरच्या, ८ लाल मिरच्या, ८ हिरव्या मिरच्या, ८ चमचे मीठ , ५० ग्रॅम कुंकू हे सर्व एका काळ्या कपडयात बांधावे व ते व्यापार क्षेत्राच्या मुख्य दरवाजाच्या आतमध्ये कोपऱ्यात टांगुन ठेवा. सर्व प्रकारचे नजर दोष शांत होतात, व्यापारात वृध्दी होते. दर अमावास्येला जुनी सामुग्री काढुन पिंपळावर किंवा चार रस्त्यावर ठेवावी. जिथे ठेवलं तिथे त्यावर पाणी अवश्य अर्पण करा.       

 सुचना वरील सर्व माहिती, मंत्र आणि उपाय संकलकाने वेगवेगळ्या इंटरनेट साईटस आणि वेगवेगळ्या पुस्तकांमधुन संकलित केलेले आहेत तरी संबंधित उपाय करण्या अगोदर जाणकार ज्योतिषाला आपली कुंडली दाखवुनच उपाय करावेत, वरील उपायाने जर चुकुन कोणाला त्रास किंवा अपाय झाल्यास सदर संकलक त्यास जबाबदार राहणार नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी.